पुणे (हवेलीनामा वृतसमूह) भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला कडाडून विरोध करणाऱ्या पुणे शहराचे माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी आपण राजकीय काम पुढे चालू ठेवण्याचे सुतवाच केले होते त्यानुसार त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्याचे जाहीर केले.

प्रशांत जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच विजय वडेट्टीवार  यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आपला महायुतीला कडाडून विरोध असल्याचे सुतवाच केले पुणे शहरावर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यावेळी सांगितले भारतीय जनता पक्षाने गेल्या काही कालावधीमध्ये पुणे शहराचे मोठे नुकसान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार अशी ग्वाही पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *