लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गवरील कदमवाकवस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या गुणांचं कौतुक करून पुढे जाण्याची प्रेरणा देण्याचा हा सोहळा होता.या संपूर्ण सोहळ्यात शेकडो प्रेक्षकांपुढे आत्मविश्वासाने आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण करणाऱ्या बालकलाकारांचे सर्वच उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.कलेच्या वेगवेगळ्या छटांचे सादरीकरण असणारे “सतरंगी” आणि शिवविचारांचा जागर करणारे “शिवचरित्र” या दोन्ही संकल्पना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून आले.
सोहळ्याचे उदघाट्न रेनबो स्कुलचे चेअरमन नितीन काळभोर, सेक्रेटरी सौ मंदाकिनी काळभोर, सीईओ प्रथमेश काळभोर, लोणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, लोणी काळभोर गावचे सरपंच नागेश काळभोर, मा. सरपंच राहुल काळभोर, शिवशाहीर महेश खुळपे, रेनबो स्कुलच्या प्रिंसिपल सौ मिनल बंडगर, व्हाईस प्रिन्सिपल प्रशांत लाव्हरे, रेनबो किड्स कायझेन स्कुलच्या प्रिन्सिपल सौ. ऐश्वर्या काळभोर यांच्या हस्ते पार पडले.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री सौ भाग्यश्री न्हालवे, सिनेअभिनेते विनायक चौगुले यांची विशेष उपस्थिती होती
रेनबो स्कुलचे नृत्य शिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारी नृत्ये सादर केली. संगीत शिक्षक कार्तिक गोरखे व विद्यार्थ्यांनी सुमधुर सुरांमध्ये गायन केले. संगीत शिक्षक शिवराज साने व विद्यार्थ्यांनी तालबद्ध वादनाचे सादरीकरण केले. कराटे शिक्षक प्रफुल्ल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कला शिक्षक दिपक शितोळे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण नेपथ्य व्यवस्था पाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती कुंभार, सौ निलोफर तांबोळी, सौ ऋतुजा देशमुख, सौ श्वेता मेटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सौ पायल बोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
