थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर पत्रावस्ती येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आवळवाडी परिसरात अवैध देशी-विदेशी दारू विक्री करत असताना वाघोली पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून त्यास ताब्यात घेतले व एकूण २१,८४०/- रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार असे आव्हळवाडी, मांजरी भागात गस्तीवर असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके यांना माहिती मिळाली की, व्हीटिपी रोड, आव्हाळवाडी येथे पत्र्याचे शेड जवळ अवैध दारूविक्री सुरू आहे. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार राम ठोंबरे, अशोक शेळके, गहिनाथ बोयणे सदर ठिकाणी जावून धाड टाकली असता आप्पा कल्याण साळवे वय ४७ वर्षे, रा. पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे हा बेकायदेशीर गावठी हातभट्टी तयार दारू, देशी विदेशी दारू विक्री करताना त्यास ताब्यात घेण्यात आले. यात १६.८४०/- रु. किं. च्या देशीविदेशी दारूच्या २४४ बॅटल, ४,९००/- रू.किं.चे गावठी हातभट्टी तयार दारूचे २४५ पाऊच असा एकूण २१,८४०/- रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे मनोज पाटील शहर, पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, परीमंडळ ७ सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *