Oplus_131072

कोल्हापूर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किनी टोलनाक्या पासून काही अंतरावर मध्यरात्री धाडसी दरोड्याचा प्रकार घडला. यात सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीची ६० किलो चांदी आणि सोने चोरट्यानी लंपास केले.

कोल्हापूर येथील मच्छिंद्र बाबुराव बोबडे हे न्यू अंगडिया सर्विस कंपनीत कामाला असून कोल्हापूर ते मुंबई पार्सल ने आण करण्याचे काम करतात. ते काल कोल्हापुरातून सोने , चांदी पार्सल घेऊन सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अशोका ट्रॅव्हल्स बस मधून मुंबईला निघाले होते.बस किनी टोल नाक्याजवळ बस पोहोचल्यावर एका प्रवाशाने वाहकाच्या गळ्याला कोयता लावून चालकास वाहन थांबवण्यास सांगितले. बस थांबताच पाठीमागून आलेल्या एका मोटारीतून दरोडेखोरांचे इतर साथीदार तेथे पोहोचले. त्यांनी बसच्या डिकीमध्ये ठेवलेली ६० किलो चांदी , एक तोळा सोने , रोख रक्कम असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला.

यावर पोलिसांनी तपासाची सूत्रे जलद हलवून बसच्या प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासले त्या आधारे हा दरोडा येथील विक्रम नगर भागातील विक्रांत कदम यांनी साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या घरात पोलिसांनी झडती घेतले असता त्यांना चोरीतील मुद्देमाल सापडला.

पोलिसांनी कदम यांच्यासह जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद , सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विपते (सांगली ), वाहक सैपू बशीर अफगाणी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित कर्जबाजारी झाल्याने व चैनी करिता हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले.

ही कामगिरी योगेश कुमार गुप्ता, अण्णासाहेब जाधव ,अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण , सागर वाघ ,संतोष गळवे, जालिंदर जाधव, हिंदुराव केसरे, संजय कुंभार, वैभव पाटील, संदीप पाटील, शिवानंद मठपती, विशाल चौगले, रोहित मर्दाणे , वसंत पिंगळे, शुभम संकपाळ, युवराज पाटील, अमित सर्जे ,अरविंद पाटील , सचिन जाधव, अनिकेत मोरे , गजानन गुरव, संतोष बर्गे , सत्यजित तानुगडे , विशाल खराडे , राजेश राठोड , सुशील पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *