थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) निवडणूक आयोगांकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार थेऊरगावच्या एकूण सहा वार्डापैकी वार्ड क्र. १ व २ आव्हाळवाडी पंचायत समिती गणास जोडला आहे परंतु प्रत्यक्षात वार्ड क्र. ३ मधील मतदाराची नावे आव्हाळवाडी गणात आली आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडून वार्डानुसार मतदार यादी जोडली आहे की बूथनुसार हा संभ्रम कायम असून कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे त्यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या गाव असलेल्या थेऊर मधील मतदारांमध्ये मात्र यामध्ये घोळच असल्याचे दिसून येते त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार थेऊर गावातील वार्ड क्रमांक एक व दोन मधून मतदान करणाऱ्या मतदारांची नावे आव्हाडवाडी पंचायत समिती गणात जोडलेली असल्याने या दोन वार्ड मध्ये आव्हाळवाडी गणातील इच्छुक उमेदवार मतदारांची संपर्क साधता आहे परंतु प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी दिलेल्या यादीत मतदारांची संख्या निश्चित काय असणार याबाबत मात्र आणखी घोळ कायम आहे.
थेऊर जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती गणातील मतदार संख्येत तब्ब्ल सहा हजारापेक्षा अधिकचा फरक असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती असेल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
