पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर तीन टप्प्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने हाती घेतला यातील पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर नुकताच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यातच राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी डिसेंबरच्या अखेरीस आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस अथवा सोमवारी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर २ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. २८ ते २९ जानेवारी रोजी मतदान अन् निकाल जाहीर होऊ शकतात. ३१ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये महायुतीने जी जोरदार मुसंडी मारली आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीची एक हाती सत्ता येताना दिसत आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून आले या निवडणुकांच्या दरम्यान विरोधी पक्ष अगदी पालापाचोळ्यासारखा बाजूला फेकला गेला अशाच प्रकारची प्रतिक्रिया सर्वात स्तरातून येताना दिसत आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष आपले अस्तित्व कितपत सिद्ध करू शकतो हा येणारा काळच ठरवेल कारण विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस शिवसेना उभाटा मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कसा तळपेळ बसेल यावरच या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक नेत्यांना संधी मिळाली पाहिजे याकरिता स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा पर्याय महायुतीतील घटक पक्ष घेण्याची शक्यता आहे परंतु परंपरागत युतीमधील घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना हे मात्र अनेक ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचे भाकीत अनेक राजकीय विश्लेषक करताना दिसत आहेत परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विशेषतः पुणे जिल्ह्यातील निवडणुका एकत्र लढविण्याचा मानस दाखविल्याने अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत यातच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाड्याचे दिसून येत आहे त्यामुळे आगामी निवडणूक काळामध्ये पुणे शहर व जिल्ह्यात काय चित्र दिसते याची उत्सुकता लागून आहे.
