इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)
शीख धर्माचे नववे गुरु तेग बहादूर यांच्या शहिदी दिनानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरु तेज बहादूर यांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे होते. प्रास्ताविकात त्यांनी गुरु तेग बहादूर यांनी अन्याय, अत्याचार आणि जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात निर्भयपणे उभे राहत मानवतेचा संदेश दिल्याचे सांगीतले तसेच हिंद की चादर या उपाधीने गुरु तेग बहादूर यांना ओळखले जाते हे नमूद केले.
विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी आपल्या मनोगतातून धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता, सत्य आणि त्याग या मूल्यांचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी कला विभाग प्रमुख डॉ.भरत भुजबळ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून शहिद तेग बहादूर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.तानाजी कसबे यांनी केले तर आभार प्रा. राजाराम गावडे यांनी मानले.
