थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांच्या वतीने प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान आयोजित “स्वस्थ नागरिक सशक्त परिवार” अभियान थेऊर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात तीन दिवशीय आरोग्य शिबीर पार पडले यात जवळपास दीड हजार नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करून घेतले.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी शिबीर स्थळी भेट देऊन शिबिराची अद्यावत कार्यपद्धती आणि रुग्णांच्या सुविधा याची पाहणी केली व सौ पुष्पलता प्रकाश सावंत व योगेश दत्तात्रय काकडे यांना शुभेच्छा दिल्या.

मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कामगार केंसरी पै. बाळासाहेब भोसले, मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीताराम उंदरे, मांजरी वि वि कार्य सोसायटीचे चेअरमन उत्तम उंदरे, मांजरी वि.वि कार्यकारी सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर जेधे, कृषी अधिकारी सोपानराव पवार,हडपसर खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र दगडू उंदरे, सुरेश अण्णा पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब माने, व्हा चेअरमन सुनील काकडे, चेअरमन रविंद्र काकडे, मांजरी वि वि सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर पवळे, व्हा चेअरमन विद्याताई पवार, संचालक महेंद्र आदमाने.यावेळी थेउरचे माजी सरपंच महादेव दामोदर काकडे,हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, संतोष काकडे,संजय काकडे, गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक बापूसाहेब नवले, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मोहन कुंजीर, पैलवान सुजित काळे, युवा उद्योजक योगेश काकडे, गुरुदत्त उद्योग समूहाचे चेअरमन सयाजी काकडे, चिंतामणी सोसायटीचे व्हाइस चेअरमन तुकाराम काकडे, राहूल काकडे, माजी सदस्य गजानन आगलावे, अक्षय चव्हाण, कैलास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 

अगदी पहिल्या दिवसापासून नागरिकांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाला याशिबिरात उत्सुकता होती ती ए टी एम मशीन बद्दल, या मशीनच्या माध्यमातून शरीरातील अनेक व्याधीचे निदान करण्यात येत असल्यामुळे प्रत्येक जण कुतूहलाने या रिपोर्ट्सची वाट पाहत होता एटीएम मधून आलेल्या चिठ्ठीत रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण चरबीचे प्रमाण त्याचबरोबर प्रत्येकाचे मेटॅबोलिक वय किती आहे हे समजत होते हाडातील ठिसूळपणा देखील तपासला जात होता या निधनानंतर आवश्यक त्या औषधोपचाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती सुरुवातीला हे शिबिर दोन दिवसाच्या घेण्याचे ठरले परंतु नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आणखी एक दिवस वाढवून गावातील गरजू नागरिकांची तपासणी करण्यात आली.

थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामधील थेऊर गावानंतर कोलवडी मांजरी आव्हाळवाडी कुंजीरवाडी आळंदी या गावांमध्ये देखील अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी सांगितले.

थेऊर येथील शिबिरादरम्यान गुरुदत्त उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष योगेश काकडे संपूर्ण शिबिर आयोजन आणि नियोजन यावर देखरेख करत होते.या शिबिरात ज्या वडिलधाऱ्या नागरिकांनी सहकार्य केले त्यांचे सौ पुष्पलता प्रकाश सावंत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *