पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बाहेरच्या जिल्हयातून येऊन वाघोलीतील वसाहतीत पार्किंग केलेली बुलेट पळवून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचा वाघोली पोलिसांनी शोध घेऊन त्यांना गजाआड केले.
वाघोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक ०५/१२/२०२५ रोजी रात्री ०१/०० सुमारास साई सत्यम पार्क, लेन नं. ३. येथून रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी पार्किंग मधुन चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पथक पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व सुनिल कुसाळकर यांनी वाघोली ते शेवगाव, नेवासा रोड असे एकूण १७० ठिकाणाचे सी.सी.टी. व्ही कॅमेरे तपासून यात १) रामेश्वर अंकूश धनगर वय २८ वर्षे, रा. गणेशनगर, पैठण, जि.छ. संभाजीनगर, २) आजीनाथ संभाजी माळी, वय २२ वर्षे, रा. सोनी सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून चोरीस गेलेली रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी व रांजणगाव आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन अशा गुन्ह्यातील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ७. पुणे शहर सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरी. मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, तोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ व शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.
