संजय बोथरा
चाकण, (हवेलीनामा प्रतिनिधी) : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मनीषा सुरेश गोरे यांची निवड झाली. तर याच गटाचे एक बिनविरोध सदस्यासह १३ नगरसेवक, राष्ट्रवादी अजित पवार गट दोन बिनविरोध सह दहा नगरसेवक, शिवसेना उद्धव ठाकरे गट एक नगरसेवक , अपक्ष एक नगरसेवक, असे सभागृहातील पक्षीय बलाबल आहे . भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
२ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर निकालासाठी १९ दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. मत मोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंदाजे एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता होती, मात्र ढिसाळ नियोजनामुळे दुपारी सव्वा दोन वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला .
चाकण नगर परिषदेतील विजयी उमेदवार –
मनीषा सुरेश गोरे ( 14905 मते ), साधना गोरे ( 2129 मते ), प्रकाश गोरे ( 2640 मते ) , जयश्री नायकवडी ( 2855 मते ), रूपाली कांडगे ( 1490 मते ) , रणजीत जरे ( 1162 मते ) , सुवर्णा राक्षे ( 704 मते ), अनिल लोहकरे ( 143 मते ), आरती परदेशी ( 966 मते ), प्रेम जगताप ( 719 मते ), नितीन गोरे ( बिनविरोध ), स्वाती लेंडघर ( 1272 मते ), पुनम शेवकरी ( 1310 मते ), वर्षा शेवकरी ( बिनविरोध ) सागर बनकर ( 768 मते ), तृप्ती जगनाडे ( 1735 मते ), आकाश जाधव ( 1356 मते ), अनिता घोगरे ( 1675 मते ), मंगेश कांडगे ( 831 मते ), विजया तोडकर ( 923 मते ), प्रकाश भुजबळ ( बिनविरोध ), विजया जाधव ( 1512 मते ), साहेबराव कड ( 1429 मते ) ,रेश्मा मुटके ( 913 मते ) धीरज मुटके ( 1041 मते ). या निवडणुकीत 24,605 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. अरे लई मागायला करतोय मी . या निवडणुकीत 765 मते ‘ नोटा ‘ म्हणून नोंदविली गेली
मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक 12 मधील मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळाचे वातावरण
निकालाची अद्यावत माहिती माध्यम प्रतिनिधींना वेळेत मिळत नसल्याने प्रशासनाचा निषेध
मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावून गर्दीवर नियंत्रण
निकालानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची मनसोक्त उधळण केली, मात्र मिरवणुकीवर बंदी असल्याने विजय उत्सव साजरा करण्यात काहीशा मर्यादा आल्या.
नोटा अधिकार 765 मतदारांनी बजावला.
