किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना- एकनाथ शिंदे गटाचे मंगेश वंसतराव गुंडाळ यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर बाजी मारली. या निवडणूकीत शिवसेनेचे १०, राष्ट्रवादी ५, भाजप ४ तर अपक्ष २ नगरसेवक निवडून आले आहेत. यावेळी प्रथमच जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष अशा स्वरूपाची निवडणूक झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य व नव्यानेच शिवसेना- एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांच्या नियोजनातून झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १० जागा मिळविण्यात शिंदे सेनेला यश मिळाले.

राजगुरुनगर नगरपरिषेदेची मतमोजणी येथील खेड तालुका क्रीडा संकुलात रविवारी (दि.२१) सकाळी दहा वाजता सुरु झाली व दिड तासात निकाल हाती येऊ लागले. मंगेश गुंडाळ हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते. विजयी मंगेश गुंडाळ यांना ७८४८ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) किरण चंद्रकांत आहेर यांना ५७५० मते मिळाली आहेत. भाजपाचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना ३०७० मते मिळाली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बापू किसन थिगळे यांना ९३९ मते मिळाली आहेत. तर अपक्ष गणेश लक्ष्मण इंगवले यांना ५५ मते मिळाली आहेत. तसेच नोटा ११८ मते आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील व मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सर्व यंत्रणा चोखपणे राबवली होती.
या निवडणूकीत नगरसेवकपदी सुनंदा थिगळे (अपक्ष), किशोर थिगळे (अपक्ष ), कुमार सांडभोर (भाजपा), राजश्री सांडभोर (शिवसेना), स्नेहल राक्षे (राष्ट्रवादी ), दिनेश सांडभोर (राष्ट्रवादी), राजेंद्र जाधव (भाजप), सिद्धी शेळके (शिवसेना), मनोहर सांडभोर (शिवसेना), ज्योती वाडेकर (शिवसेना), अमोल वाळुंज (शिवसेना), श्वेता ढोले (शिवसेना), कल्पना आढारी (शिवसेना), वैभव घुमटकर(राष्ट्रवादी), सुप्रिया घुमटकर (राष्ट्रवादी), निलेश घुमटकर (भाजपा), आशा गुंडाळ (शिवसेना ), आश्विनी आवटे (शिवसेना), फैज मोमिन(भाजपा), मित्रसेन डोंगरे( राष्ट्रवादी ),सुप्रिया पिंगळे (शिवसेना) हे निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांची कार्यकर्ते व नागरीकांनी जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केले.
