tempo driver kicked a person to death
          पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या काही महीन्यापासून बारामती, शारदानगर माळेगांव, सांगवी भागांमध्ये घरफोरडी चोरीचे प्रमाण
वाढल्याने पुण्याचे पोलीस अधिक्षक यांनी  घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सुचना दिल्या होत्या. यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास परिसरातील रेकॉर्डवरील आरोपीचा तपास करणे, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणे वगैरे सुचना दिल्या.
 नुकत्याच सांगवी येथील श्री वरूण तावरे यांचे विजय इंडस्ट्ीज नांवाचे पत्रा बनविण्याची कंपनीमध्ये पत्रा उचकटून घरफोडी चोरी केल्याबद्दल तकार दाखल
दिली होती या चोरीच्या तपास करण्यासाठी बारामती तालुका पोलीस स्टेशन अंकीत माळेगांव चौकीचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे व सहकारी, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आजूबाजूचे सिसिटीव्ही व तांत्रीक माहीतीचे आधारे आरोपींचा शोध सुरू केला. शोध सुरू असतांना सपोनि  घुगे यांना गुप्त बातमीदारामार्फत
माहीती मिळाली की, हा गुन्हा सांगवी ता फलटण जि सातारा येथील महेश भिमा शिंदे याने त्याचे साथीदारांसह केला आहे. अशी माहीती मिळाल्यावर  बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना याची माहिती दिली, त्यांनी लगेच गुन्हेगारास जेरबंद करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे, पोलिस नाईक राजेंद्र काळे, पोशि प्रशांत राउत, दिपक दराडे, तपास
पथकाचे पोलीस शिपाई विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूुल पांढरे असे पथक तयार करून रवाना केले.व त्यांनी महेश भिमा शिंदे यास सांगवी ता बारामती जि पुणे येथून सापळा रचून अटक केली.       पोलीस कोठडीत या गुन्हयासह शारदानगर येथे झालेली एटीएम फोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा, देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगून गुन्हयाचे ठिकाण दाखविले. देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हयातील चोरी गेले सोन्यापैकी ४.५ तोळे वजनाचे एकूण रु.२ लाखाचे सोन्याचे दागीणे जप्त करण्यात आले आहे.  तसेच अधिक तपासादरम्यान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हददीमध्ये एप्रील २०२० मध्ये साठे फाटा फलटण येथील ए व्ही गार्डन परमीट रूममधून दिड लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीची दारू घरफोडी चोरी करून नेली असल्याची कबूली दिली आहे.  तपासादरम्यान देवकाते पाटीलगनगर येथील
घरफोडीच्या गुन्हयातील चोरून नेलेले सोन्याचे दागीणे इसम नामे बाळकृष्ण तात्याबा यादव रा सांगवी ता फलटण जि सातारा यांचेकरवी विकी केल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. त्या गुन्हयाचा तपास सपोनि महेश विधाते हे करीत आहेत. हा गुन्हेगार फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण प्रामीण पोलीस स्टेशनचा
सराईत असून त्याच्यावर ११ घरफोरडीचे व ०१ दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.
       ही कामगीरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल घुगे, पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड,
शशिकांत वाघ, पोलीस नाईक राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोलिस शिपाई प्रशांत राउत, दिपक दराडे, तपास पथकाचे पोलीस शिपाई विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूल पांढरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *