लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच पंचायत समिती सदस्य यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केलेल्या सातत्याने पाठपुराव्या नंतर अनेक विकासात्मक कामे मार्गी लागत असून लोणी गावाला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या डाक बंगला रस्त्याच्या विकासासाठी ४५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवआण्णा काळभोर, माजी पंचायत समिती उपसभापती सनी काळभोर हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच ज्योती काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, आप्पासाहेब रंगनाथ काळभोर, श्री.आण्णासाहेब काळभोर, आनंदा काशिनाथ काळभोर, मोहन लक्ष्मण काळभोर, ग्रा.पं. सदस्या ललिता राजेंद्र काळभोर, सौ.साविता गीताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, संगीता सखाराम काळभोर, रत्नाबाई वाळके, नागेश काळभोर, भरत काळभोर तसेच अमित काळभोर, युवराज काळभोर, राजेंद्र यशवंत काळभोर,सचिन काळभोर, सागर काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.
लोणी काळभोरचे नागरीकरण अलीकडे मोठया प्रमाणावर वाढत असून नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतवर भार वाढत आहेत यासाठी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
