पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माऊंटरिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित २६ दिवसीय गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी पुणे ग्रामीण पोलीसचे  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची निवड करण्यात आली आहे
        पुणे ग्रामीण पोलीस सेवेत असलेले उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात केलेल्या विशेष कामगिरीसाठी त्यांना माननीय पोलीस महासंचालक पदक तसेच केंद्र सरकारकडून आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित केले आहे अटल बिहारी वाजपेयी मौंटेनीरिंग इन्स्टिट्यूट येथे होत असलेल्या या प्रशिक्षण शिबिरात विविध राज्यातील ३९ प्रशिक्षणार्थी सहभागी आहेत यामध्ये शिवाजी ननवरे यांच्यासह पुणे येथील द आल्पेनिस्ट या संस्थेचे ज्ञानेश्वर फुगे, ओम काकडे,सुमित गावडे, अक्षय शेलार, संस्कृती ढमढेरे यांचा सहभाग आहे या शिबिराचे ११ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या दरम्यान आयोजन केले आहे यामध्ये रॅपलिंग,रिव्हर क्रॉसिंग,नैसर्गिक रॉक क्लाइंबिंग, सह भूकंप, लँड स्लाईड, पूर आग लागणे ,इमारत कोसळणे या दुर्घटनेतून नागरिकांचा बचाव करून जीव वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच हिमालयीन गिर्यारोहणाचे कौशल्य शिकवून  बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये व हिमालयात या शिबिरांअंतर्गत  सहभागी प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्षिक करून घेतले जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *