पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टी कामगारांची फरफट थांबेना आज आणखी एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर येथे घडल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे एस टी कामगारांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे

          एस टी कामगारांची आर्थिक देणी शासनाने वेळेत दिली नाहीत परिणामी कामगारांना वेळेवर पगार मिळत नाहीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी टोकाचे पाऊल उचण्यास सुरुवात केली आहे आज पंढरपूर आगारातील कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली ही २५ वी कामगाराची आत्महत्या आहे आणखी किती कामगारांचा बळी शासन घेणार आहे येणारी दिवाळी तरी चागली जावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असे कामगार संघटनेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *