पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून राजस्थान मध्ये पळून नेले त्यावर पुणे पोलीस अंतर्गत असलेल्या काळेपडळ पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेऊन या दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली.

काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दोन अल्पवयीन मुली गायप झाल्याची तक्रार झाल्यानंतर याचे गांभिर्य लक्षात घेवून दाखल गुन्ह्याचे तपासात संशयित इसमांचे मोबाईल नंबर मिळून आल्याने मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्याचे तपासाकरीता तात्काळ एक पथक रवाना करुन सदर अल्पवयीन मुलींचा व संशयीत आरोपींचा वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात) फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपुर (राजस्थान) येथे ३३०० कि.मी. प्रवास करुन आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता त्यातील एक मुलगी ता. राणी, राज्य राजस्थान व दुसरी मुलगी जि. पाली, राज्य राजस्थान येथून अल्पवयीन मुलींची सुटका केली. तसेच अल्पवयीन मुलींना फुस लावणारे संशयीत १) सुरेशकुमार वडदाराम प्रजापती, वय २१ वर्ष, रा. राणी, राजस्थान २) सुरेशकुमार मोहनलाल राणाभील, वय ३१ वर्ष, रा. राणी, राजस्थान यांना अटक करण्यात आली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर, राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, नग्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच युनिट ५. गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *