पुणे (हवेलीनामा वृतसमूह) नविन रेशनकार्ड देण्यासाठी १९ हजाराची लाच मागून तडजोडीनंतर १६ हजार रुपये स्वीकारताना नागरी अन्नधान्य पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,गजानन अशोकराव देशमुख वय 36 वर्ष, व्यवसाय नोकरी पद परिमंडळ अधिकारी, अन्नधान्य वितरण कार्यालय ‘फ’ झोन, भोसरी, पुणे, रा.ठी. फ्लॅट नंबर 404 निर्माण हिलसाईड, तळजाई पठार, धनकवडी, पुणे. (वर्ग-2) यांना लाच मागणी व स्विकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सविस्तर तपशील असा की, तक्रारदार हे अपंग असून समाजकार्य करतात त्यांना शासकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते त्यांचे मित्र व ओळखीचे लोकांसाठी नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी मदत करत असतात. तक्रारदाराचे मित्र व ओळखीचे असे एकूण 14 जणांनी तक्रारदार यांना त्यांची नवीन रेशन कार्ड काढण्यासाठीचे अधिकार पत्र देऊन सोबत सरकारी फी प्रत्येकी ५०/- रुपये असे दिल्यानंतर तक्रारदाराने 14 जणांचे प्रस्ताव तयार करून सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून पन्नास रुपये शासकीय फी ऑनलाइन भरल्यानंतर त्या १४ जणांना १४ रेशन कार्ड चे ‘एन’ नंबर प्राप्त झाले. त्यानंतर तक्रारदार हे सदर १४ नवीन रेशन कार्ड मिळणेकरिता भोसरी अन्न नागरी पुरवठा विभागाचे चे पुरवठा निरीक्षक देशमुख यांना भेटले असता त्यांनी प्रत्येक नवीन रेशन कार्ड साठी ९००/-रुपये प्रमाणे १४ रेशन कार्डचे १२, ६००/- रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यांना सांगितले. देशमुख यांनी प्रत्येक रेशन कार्ड साठी ९००/- रुपये प्रमाणे मागितलेले बारा हजार सहाशे रुपये हे शासकीय फ़ी व्यतीरिक्त असून त्यांनी मागितली रक्कम ही लाच रक्कम असून ती देण्याची तक्रारदार यांची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक १० डिसेंबर, २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुशंगाने दि.११ डिसेंबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीत लोकसेवक परीमंडळ अधिकारी भोसरी, गजानन देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे १४ रेशन कार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुस्वातीस १४ रेशन कार्ड पैकी १० रेशन कार्ड करता प्रत्येकी १,५००/- असे एकूण १५, ०००/- रुपये व उर्वरित चार रेशनकार्ड साठी प्रत्येकी १,०००/-रुपये प्रमाणे एकूण ४, ०००/- असे १४ रेशन कार्ड नवीन तयार करून सही शिक्क्याने देण्यासाठी १९ हजार रुपयाची मागणी करून ताडजोडीअंती १६, ०००/- रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, अन्नधान्य वितरण कार्यालय, भोसरी, पुणे यांनी त्यांचे कार्यालय अन्नधान्य वितरण कार्यालय भोसरी पुणे येथे तक्रारदाराकडून १६, ०००/- रुपयाची लाच स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *