प्रविण कांबळे
खामगाव (हवेलीनामा प्रतिनिधी) दौड तालुक्यातील खामगाव येथील पांदन रस्ता खुला करण्यासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी दोन्ही गटातील प्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी चर्चा करून रस्ता खुला करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
तपासणीदरम्यान तंटामुक्त समिती अध्यक्ष शैलेश पंडित, पोलीस पाटील जगताप मॅडम, सर्कल अधिकारी भोसले, तसेच सनी भगवत उपस्थित होते. याशिवाय दोन्ही गटातील ग्रामस्थ, उपस्थित होते तुषार कांबळे व त्यांची सहकारी मित्र होते व संबंधित सर्वांनी सहकार्य दर्शविले.
अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी नोंदीनुसार, ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक व सर्वसामान्यांच्या नियमित वापरासाठी हा पांदन रस्ता आवश्यक असून, त्याच्या वापरास कोणत्याही पक्षाकडून हरकत नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
“पोलिस पाटील, सरपंच, तलाठी व महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त तपासणीनंतर पांदन रस्ता खुला करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.”
व गावातील दोन्ही गटांनी हा निर्णय स्वीकारत शांतता व संवाद राखण्यासाठी पुढील काळातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
