SPORTS | सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).येथील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व के.एस.डी. शानभाग विद्यालयाचे संस्थापक रमेश शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामसुंदरी क्लब सातारा यांच्या वतीने श्यामसुंदरी युवा क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन जानेवारी 2026 ,फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे .
या स्पर्धेबद्दल माहिती देताना रमेश शानभाग म्हणाले की , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व खेळ संघटनेमार्फत घेण्यात येणा-या स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना सराव सामने खेळण्याची संधी मिळत नाही. शामसुंदरी क्लबच्या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धेसाठी पुन्हा जोमाने तयारी करतील व ते स्पर्धेच्या प्रवाहात राहतील हा आमचा या स्पर्धा आयोजित करण्यामागे उद्देश आहे.
सांस्कृतिक स्पर्धा ११ जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येतील.क्रीडा स्पर्धा २४ जानेवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येतील.
या क्रीडा स्पर्धा वयोगट १२ वर्षाखालील मुले व मुली,१४ वर्षाखालील मुले व मुली,१७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटांमध्ये घेतल्या जाणार आहेत.सांस्कृतिक स्पर्धा वयोगट १० वर्षाखालील मुले व मुली,१५ वर्षाखालील मुले व मुली, १८ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटांमध्ये घेतल्या जाणार आहेत.प्रवेश निश्चितीसाठी आपला सहभाग के. एस. डी. शानभाग विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, दौलतनगर, सातारा येथे प्रत्यक्ष भेटून २५ डिसेंबर २०२५ पूर्वी नोंदवावा ही विनंती आहे. तसेच या स्पर्धेसाठी क्रीडा प्रकारात बास्केटबॉल ,फुटबॉल ,हॉकी, क्रिकेट, जलतरण, रीले व मैदानी रीले या खेळांना सहभाग देण्यात आला असून वैयक्तिक प्रकारामध्ये मैदानी खेळ बॉक्सिंग जलतरण योगासन ,पारंपारिक, रिदमिक,रायफल शूटिंग प्रकारात एअर पिस्टल, एअर रायफल, पीप साईट रायफल यांना सहभागी करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक नृत्य ,समूह नृत्य ,गायन, आशुभाषण, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, वादन ,चित्रकला व एकांकिका या प्रकारांना स्थान देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी , सहभाग निश्चितीसाठी 25 डिसेंबर 2025 पूर्वी क्रीडा प्रमुख अमित कृष्णा उघाडे, ९०२१२५४०३७, के. एस. डी. शानभाग विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, सातारा. यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
