नागपूर (हवेलीनामा) पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात ८ हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत १ लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. अशी लक्षवेधी सूचना हिवाळी अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी मांडली.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न भयंकर गंभीर बनत चालला असून सर्वसामान्य नागरिकांवर अलीकडे या मोकाट कुत्र्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत एवढे असताना देखील मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा.. कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम! असल्याचे स्पष्ट केले.
