पुणे (हवेलीनामा वृतसमूह) भेकराई माता विद्यालयाचे सहशिक्षक प्रवीण भोसले यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा 4249 किलोमीटरचा आशिया खंडातील सर्वात मोठा सायकल प्रवास करून एक कीर्तीमान मिळवला त्यांच्या या कामगिरी मुळे त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त Youth & Sport Ministry Of India व Fit India Movement यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी देशातून केवळ 150 सायकल चालकांची निवड करण्यात आली यासाठी संपूर्ण देशातून 3000 अर्ज प्राप्त झाले होते हा सर्व प्रवास या सायकल चालकाने केवळ 16 दिवसातच पूर्ण केला या प्रवासाची सुरुवात जम्मू काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगर या ठिकाणाहून झाली अतिशय कडाक्याच्या थंडीमध्ये या सायकल प्रवासाला सुरुवात झाली नियमित तीनशे किलोमीटर दररोज सायकल प्रवास करत हे लक्ष साध्य केले प्रवासादरम्यान पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यामध्ये या सायकल स्वरांचे जोरदार स्वागत करण्यात आले गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी या सायकल स्वरांचा विशेष सन्मान करण्यात आला तर कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे क्रीडामंत्री यांनी या सायकल स्वरांचे विशेष स्वागत केले.

“Ride for unity, Nation and Pride”

हे घोषवाक्य घेऊन हा सायकल प्रवास संपूर्ण देशातून करण्यात आला मार्गामध्ये अनेक गावांमधून शहरांमधून एकतेचा संदेश देत हे सायकल प्रवासी आपला प्रवास करत होते भारतीय संस्कृतीची विविधता अनुभवण्याचा हा एक सुखद क्षण असल्याचे सहभागी सायकल स्वाराने आपल्या कथनात सांगितले. Dare to Gear या गटाकडून या प्रवासाचे संपूर्ण नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *