तळेगाव ढमढेरे (हवेेेलीनामा ऑनलाइन) लखीमपुर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तळेगांव ढमढेरे येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ महविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यानुसार सोमवार (दि.११) रोजी सकाळी तळेगांव ढमढेरे येथील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परीसरातील नागरिक व शेतकऱ्यांची सोय होण्यासाठी आठवडे सुरू होता. तळेगांव ढमढेरे परिसरातील अनेक गावांनी या बंद चे पडसाद पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंद मध्ये सहभाग घेतला होता.तळेगांव ढमढेरे येथून पुणे कडे जाणारी पीएमपीएल बससेवा बंद होती. सार्वजनिक वाहतूक सेवा काही प्रमाणात सुरू होती. आठवडे बाजारात ही गर्दी कमी झाल्याचे चित्र होते.
तळेगांव ढमढेरे परिसरात बंद ला शांततेत प्रतिसाद मिळाला. पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही.
येथील आठवडा बाजार वगळता नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी बंद ला संमिश्र प्रतिसाद दिला.
