पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात काल अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून हत्या केली त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून यावर सर्व स्तरातील महिला वर्गातून तिव्र,तिखट प्रतिक्रिया येत आहेत.सध्या नवरात्री चालू आहेत यात मुलींची देवीच्या रुपात पुजा केली जाते तर दुसरी विकृत मानसिकता अनुभवास येते हा विरोधाभास !
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटनेत वरचेवर वाढ होत आहे एखादी घटना घडल्यावर त्यावर रान उठवलं जात परंतु काही दिवस उलटले की पुन्हा त्यावर पाठपुरावा केला जात नाही काळ बिबवेवाडी येथे एका १४ वर्षीय कबड्डी पट्टू असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने आपल्या सहकार्याच्या मदतीने कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली मग मुलींनी आपल्या घराबाहेर पडल्यावर त्यांचा सुरक्षेचे काय असा पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
यावर आलेल्या प्रतिक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हवेली तालुका सरचिटणीस कविता शेडगे यांनी सांगितले की, मुलींनी कोणतीही घडलेली घटना आपल्या आईवडील यांना अवगत करावी कोणतीही गोष्ट लपून ठेवू नये एखादी घटना घडण्या अगोदर तिची सोडवणूक व्हावी तर समाजाने जागरूकता दाखवली पाहिजे.
तर सुवर्णा कांबळे व वैद्यकिय क्षेत्रातील महिला डॉ पुजा यांनी कठोर शिक्षा व्हावी न्यायव्यवस्था जलद गतीने पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
ज्योती टोम्पे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की,”अशा नराधमांना भर चौकात विनावस्त्र फटके देत मिरवणुक काढत तोंडाला काले फासुन गाढवावर बसुन चप्पलचा हार घालुन मिरवणुक काढावी. कारण फाशी म्हणजे तो एकदाच मरेल पण जर असे काही केले तर तो रोजच मरेल त्याला कुठे नोकरी नाही मिलावी व अन्य सुविधा पण नाही मिलाव्या म्हणजे त्याची समाजात असणारी खोटी प्रतिष्ठा धुलीला मिलेल. आणि तो जगण्याच्या लायकच राहणार नाही. आणि जर खरे प्रेम असते तर कोयत्याने का हत्या केली असती हे लोक फक्त वासनाअंध असतात . ज्या देशात नवरात्र उत्सव साजरा करतात, आईची पुजा करतात त्याच देशात हे असे भंगार ,नीच प्रकार घडतात आणि या लोकांना प्रोत्साहन देणारी ही राजकिय लोक किंवा राजकारण थोड्या पैशासाठी अशा लोकांना पाठीशी घालतात मग असे काही मोठे घडते. पण खुप दुर्भाग्य अशी ही घडना आहे एकीकडे देवीचे उपवास आणि दुसरीकडे त्याच देवीवर असा घात. या अवस्थेला फक्त राजकिय मानसिकता आणि लोकांची नीच मानसिकताच जबाबदार. लगेचच शिक्षा झाली तर असे बाकिचे लोक हिंमतच नाही करणार असे क्रुत्य करायला .पण असे काही आपल्याकडे होत नाही हे खुप मोठे दुर्भाग्य आहे.”
शालेय शिक्षिका परदेशी मॅडम यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “प्रेम या शब्दाची व्याख्याच बदलली गेली आहे. कारणं अनेक आहेत. विभक्त कुटुंब, संस्कारांचा अभाव, प्राप्तीची हाव आणि सोशल मिडियाचा अति वापर ही काही कारणं……
पण या बदललेल्या परिस्थितीला पूर्ववत करण्यासाठी कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत.ज्याच्यावर प्रेम करता त्याला जपायला शिकवणं गरजेचं आहे. मग ते सजीव असेल अथवा निर्जीव.किशोरवयीन आणि कुमारवयीन मुलामुलींना या बाबी समजून सांगणं ही काळाची गरज आहे”.
इनर्व्हेल क्लबच्या अध्यक्ष सीमा भोसले,”कोविड पश्चात निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती पाहता समाजात सर्व थरावर असुरक्षित वातावरण तयार झाले आहे ,यामधे तरुण आणि तरुणी हा गट मानसिक दृष्ट्या सक्षम , सबल करणे आवश्यक आहे ,या साठी , समुपदेशन , कृतीच्या परिणामांची भीषणता , आणि वास्तव याची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे . झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून , भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशा उपाय योजना करणे आवश्यक आहे”
हिलींग हँड फाउंडेशन च्या अनिता सैद म्हणाल्या की,”या घटनेत आणि बलात्काराच्या घटनेत माझ्या मते गुन्हेगाराला भर रस्त्यात चपलांचा हार घालून एक एक अवयव निकामी केला पाहिजे जेणे करून असे दुसरे कोणी पुन्हा करायचा विचार पण करणार नाही”
अँड पूनम कांबळे यांनी सांगितले की,महिलांना ५० टक्के आरक्षण दिल महिला घराबाहेर पडल्या परंतु पुरुषी मानसिकता बदलत नाही महिला सक्षमीकरण सबलीकरण याचे केवळ स्तोम माजवले जात आहेत प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे अशा घटनेत न्यायालयाने कठोरात कठोर शिक्षा सुनावली पाहिजे अत्याचार करणारा पुन्हा असे कृत्य करताना घाबरला पाहिजे.
