पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार असल्याने अनेक पक्ष पदाधिकारी कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवेली पदाधिकाऱ्यानी कामाची कंबर कसली असून अनेक तरुण कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे त्यामुळे पक्षाला नक्कीच उभारी मिळण्यास मदत होणार आहे.
      महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवेली तालुका यात अनुल सुरेश कुंजीर(सहकार सेना तालुका अध्यक्ष), विश्वजित काळभोर (तालुका उपाध्यक्ष), सनी फलटणकर (तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना), विकास रेड्डी, विकी कुराडे, गौरव कुंजीर, चेतन चौधरी, संदीप  नाळे, दिपक मराठे,विजय ढोपरे व पत्रकार बंधू यांच्या नेतृत्वा खाली जाहीर पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला
या वेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे राज्याचे नेत राजेंद्र बाबू वागस्कर, राज्याचे सरचिटणीस ॲड किशोर भाऊ शिंदे,कामगार सेनेचे सह चिटणीस कृष्णा भाऊ मोहिते,पुणे शहर माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे,पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते शहर अध्यक्ष जनहित कक्ष नरेंद्र तांबोळी,पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गणेश म्हस्के,पुणे शहर सचिव जनहित कक्षाचे ॲड राहुल कदम यांच्या उपस्थितित राज ठाकरे याच्या विचाराने पेरित होऊन हवेली तालुक्यातील सगळ्याच प्रमुख पक्षातील  शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. कु.अजिंक्य अर्जुन चौधरी व महेश फलटणकर याचे पक्ष प्रवेश विशेष मानले जात आहेत, या वेळी उपस्थित मनसे च्या नेत्यानी कार्यकर्त्यांना चांगले मार्गदर्शन केले व कार्यकर्त्या मधून च नेता घडतो सांगून कार्यकर्त्यांना बळ दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *