केडगाव (हवेलीनामा प्रतिनिधी) स्माईल फाऊंडेशन व हरे रामा हरे कृष्ण फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष आनंद थोरात आणि राष्ट्रीय अध्यक्ष- भटक्या विमुक्त जाती जमाती महासभा व हरे रामा हरे कृष्णा या संस्थेच्या खजिनदार किरण शिंदे यांच्या पुढाकारने बोरीपारधी येथील नाथनगर विद्यालय येथे करण्यात आले होते.

शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकूण २१५ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. शिबिराचे उद्घाटन आनंद थोरात, सरपंच बाळासाहेब सोडनवर, उपसरपंच सौ शर्मा , गणेश एचपी गॅस चे संचालक संपत मगर,,नाथ नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पवार, नाथनगर विद्यालयाचे सर्व शिक्षक , बोरी पारधी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि स्माईल फाऊंडेशनच्या टीम यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरात रक्तदाब तपासणी,रक्तशर्करा तपासणी,रक्त तपासणी,दात तपासणी,BMI तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला,मोफत औषध वितरण करण्यात आले तसेच आहार व आरोग्य यांच्या विषयी विशेष सल्ला देण्यात आला अशा विविध सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत देण्यात आल्या.

शिबिराच्या आयोजनासाठी स्माईल फाऊंडेशनचे डॉ. शंतनु पाटील, प्रियांका मोहिते, धनश्री भावने , डॉ. श्रद्धा संजीव सावंत, आरोग्य सल्लागार सौ.सुलन ढमे तसेच वाहनचालक सिद्धार्थ सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्थानिक शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ, मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमानंतर अयोजक हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य . खजिनदार सौ किरण शिंदे यांनी सर्व उपस्थियांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *