पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून खराडी, चंदननगर मधील संभाजीनगर येथील “ए वन स्पा” सेंटरवर छापा टाकून पाच पीडिताची सुटका केली तर दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली की,खराडीतील “ए वन स्पा” सेंटरवर मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेतला जात आहे.यावर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बनावट ग्राहक याचे सहयाने सदर बातमीची खात्री करुन “ए वन स्पा” येथे अचानक छापा टाकुन १) सुवर्णा संदिप क्षिरसागर वय ३८ वर्षे, रा. कसबा पेठ पुणे (स्पा मॅनेजर) २) अश्वीनी परेश कोळेकर, वय ३६ वर्षे, रा. कोंढवा पुणे (स्पा मालकिन) यांना ताब्यात घेतले आणि वेश्याव्यवसायासाठी ए वन स्पा मध्ये आणलेल्या ०५ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, दत्ताराम जाधव बबनराव केदार, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, भुजबळ, म.पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, रेश्मा कंक, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.
