पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेले लिक्विडेटर व खाजगी व्यक्ती याचवर ८ कोटी रुपयांची लाच मागणी व ३० लाख रुपये स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात अडकले.
लाजलुपत विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार,लोकसेवक विनोद माणिकराव देशमुख वय ५० वर्ष, धंदा शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेले लिक्विडेटर, फ्लॅट नंबर ५०५, सिंहगड दर्शन सोसायटी, वडगाव खुर्द, धायरी फाटा, पुणे 2) भास्कर राजाराम पोळ ५६ वर्षे, धंदाः सरकारी पॅनल वरील ऑडीटर, सुश्रुत रेसिडेन्सी, बी ७, गजानन महाराज मंदिराजवळ, नर्हेगाव, पुणे. यांना सापळा कारवाईत अटक करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार हे धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटी सर्वे नंबर १० या सोसायटीचे नवीन सभासद आहेत तसेच इतर 32 नवीन सभासद आहेत की ज्यांनी २००५ मध्ये जुन्या सभासदाकडून नमूद सहकारी सोसायटीचे शेअर विकत घेऊन नवीन सभासदत्व घेतले होते. परंतु सन २०२० मध्ये मूळ सभासद आणि नवीन सभासद यांच्यामध्ये सभासदत्वावरून वाद होऊन तो वाद सहकार विभागाकडे गेल्यानंतर सहकार विभागाने नमूद सोसायटीवर प्रशासक नेमले. नेमलेल्या प्रशासकाने मूळ सभासद व नवीन सभासद यांच्याकडे चौकशी करून एक अहवाल सहकार विभागाकडे सादर केला त्या अहवालानुसार सहकार विभागाने ती सोसायटी आवसायनात काढल्याचे जाहीर केले. सहकार विभागाकडून नमूद सोसायटीवर 2024 मध्ये लोकसेवक विनोद माणिकराव देशमुख यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले.
सन २०२३ मध्ये तत्कालीन प्रशासक म्हणून असलेले भास्कर राजाराम पोळ यांच्या नावे अर्ज करून त्यामध्ये शेअर सर्टिफिकेट मिळावेत विनंती केली होती. त्यावर त्या विनंती अर्जावर कार्यवाही करून तक्रारदार सोडून इतर 32 नवीन सभासदाचे अर्ज निकाली काढले परंतु तक्रारदार हे सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याने त्यांचा विनंती अर्ज प्रलंबित ठेवला. सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदार त्यांच्या विनंती अर्जाबाबत प्रशासक असलेले भास्कर पोळ यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता त्यावेळी भास्कर पोळ यांनी तक्रारदार व इतर 32 सभासद यांना शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी स्वतःसाठी व सध्या लिक्विडेटर म्हणून कार्यरत असलेले देशमख यांच्यासाठी 3 कोटी रुपयांची लाच मागत असल्याबाबत तसेच भविष्यात होणा-या लिलाव प्रक्रियेमध्ये नमूद सहकारी सोसायटीची जागा तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला देण्यासाठी ५ कोटी रुपये असे एकूण 8 कोटी रुपयाची लाच मागितल्याची तक्रार तक्रार यांनी दि.५ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी लाच पडताळणी कारवाई केली असता त्यामध्ये भास्कर पोळ याने तक्रारदाराचे वरील काम करून देण्यासाठी स्वतःसाठी व लिक्विडेडर देशमुख यांच्यासाठी तीन कोटी रुपये व लिलाव टेंडर प्रक्रियेमध्ये तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीस टेंडर देण्यासाठी ५ कोटी रुपये असे एकूण ८ कोटी रुपयाची लाच मागून अनामत रक्कम म्हणून 30 लाख रुपये मागितलेचे निष्पन्न झाले.
दिनांक ५ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान देशमुख हे स्वतः शनिवार पेठेतील तक्रारदार यांच्या कार्यालयासमोर आले व तक्रारदाराकडे लाचेबाबत सकारात्मक बोलणी करून तक्रारदाराच्या वरील कामासाठी अनामत म्हणून 30 लाख रुपयाची लाच रक्कम ०६. ५५ वाजता पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांनी ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करत आहे
