पुणे (हवेलीनामा वृतसमूह) ‘ई- ऑफिस’ मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी व तो मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक यांनी १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली ती लाच कार्यालयात स्वकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली. बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रावसाहेब भगवान मिरगणे वय 57 वर्षे, पद- शिक्षण उपनिरीक्षक, नेमणूक- विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे, सध्याचा पत्ता ग्रीनव्हील सोसायटी, फ्लॅट नं. २-808, डीपी रोड, मावळा हॉटेल जवळ, हडपसर, पुणे (वर्ग 2) असे लाच मागणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे नावं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकारानुसार, तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून नोकरीस आहेत. त्यांना शालार्थ आयडी’ नसल्याने त्या २०१६ पासून विना वेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन वालू होणार होते.तो शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडी चा प्रस्ताव दि. १६ जून २०२५ रोजी त्यांचे विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे, येथे दाखल केला होता. याचा प्रस्ताव ‘ई- ऑफिस’ मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले शासकीय कर्मचारी यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली याची तक्रार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली.

दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान रावसाहेब मिरगणे, शिक्षण उपनिरीक्षक, यांनी तक्रारदाराच्या पत्नीची ‘शालार्थ आयडी’ मंजूर करून देण्यासाठी १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आज रोजी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी ०६. २१ वा. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये लाच पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *