श्री क्षेत्र थेऊर येथील स्थानिक उमेदवार म्हणून पल्लवी युवराज काकडे यांना मतदारांकडून मोठी पसंती मिळत असून थेऊर गावातील वाड्या वस्त्या मधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.आरोग्यदूत म्हणून सर्व परिचित असलेले युवराज हिरामण काकडे यांनी गेल्या काही वर्षांपासून थेऊरसह परिसरातील अनेक गावामध्ये भरघोस केलेली कामे याच्या जोरावर मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद अनुभवास येत आहे.

थेऊर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे इतर मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव निघाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालू आहे असे असताना देखील सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसांना सध्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून अत्यंत महागड्या आरोग्य सेवेमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर हा खर्च जात आहे त्यामुळे आरोग्यदूत म्हणून सर्व परिचित असलेले युवराज काकडे यांनी थेऊर जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या गावात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या आरोग्यांच्या समस्या भेडसावतात त्यावर तज्ञ डॉक्टरांची टीम उभी करून सर्व उपचार मोफत करून दिले काही आजारांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे अशा शस्त्रक्रिया असणाऱ्या आजारांसाठी अत्यंत माफक किंवा बहुतेक मोफतच या शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य मतदार आपल्या कुटुंबासह या महाआरोग्य शिबिरासाठी हजेरी लावताना दिसतो आहे त्यामुळे आळंदी म्हातोबा कोलवडी साष्टे मांजरी खुर्द आणि श्री क्षेत्र थेऊर या ठिकाणी पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

आरोग्य दूत म्हणून कार्य करत असताना थेऊर व पंचक्रोशीतील अनेक रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे काम युवराज काकडे यांनी केले तसेच मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध करून देणे तसेच शस्त्रक्रियांसाठी लागणारी रक्कम गोळा करणे यासाठी मदत केली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये युवराज काकडे यांच्या बद्दल मोठा आदर आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व मिळाल्यास थेऊरसह थेऊर गटातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याची धमक युवराज काकडे यांच्याकडे असल्याची नागरिकांची धारणा निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये थेऊरसह थेऊर पंचायत समिती गणांमधील कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबा या गावांमधून त्यांना नक्कीच पसंती मिळणार आहे त्यांच्या सौभाग्यवती पल्लवी काकडे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार असल्याने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *