पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) आज सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पुरती भंबेरी उडवली विशेषतः येरवडा जेल परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण निर्माण झाली दुचाकी वाहन बंद पडत होती.
पावसाळ्याचे तसे शेवटचे नक्षत्र चालू असून मोसमी पाऊस परतीच्या प्रवासाला आहे हा हस्त नक्षत्रातील पाऊस मोठा असतो नवरात्रीच्या दिवसात हा मोठया प्रमाणावर पडतो आज पाच वाजण्याच्या सुमारास पूर्व उत्तर दिशेला काळ्याभोर ढगांची दाटी झाली थेऊर व परिसरात मोठा पाऊस होईल असे वाटले परंतु तो बाजूनी फिरला व पुणे शहराच्या उत्तर भागात चंदननगर, येरवडा या ठिकाणी धुवून काढले.
थेऊर व परिसरातील गावात मात्र हलक्या सरी कोसळत होत्या परंतु यातही विजेचा लपंडाव मात्र चालू होता साडेसहा वाजता वीज गायब झाली ती नऊ वाजेपर्यंत पूर्ववत झाली नव्हती
