तळेगाव ढमढेरे (हवेलीनामा ऑनलाइन) विठ्ठलवाडी येथे व्हेंटाइल कंपनी आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी यांच्या वतीने एक दिवशीय फ्री सर्व्हिस कॅम्प चे आयोजन केले होते.
हा कॅम्प गेली ४ वर्षे विठ्ठलवाडी येथे मधुकर दोरगे यांच्या माध्यमातून व विशेष प्रयत्नातून आयोजित केला जात आहे या फ्री सर्व्हिस कॅम्पसमध्ये विठ्ठलवाडी येथील शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दर्शवला या आयोजित कार्यक्रमात व्हेंटाईल कंपनी सुशील देसाई आणि महेंद्रा ट्रॅक्टर कंपनीचे कस्टमर रिलेशन सिनियर मॅनेजर गजानन कावडे, कस्टमर केअर महाराष्ट्र राज्य निलेश जोशी हे आणि त्यांचा इंजिनिअर स्टाफ यांनी सर्व्हिसिंग कॅम्पमध्ये कोणकोणते सुविधा दिल्या जाणार आहेत आणि त्याचे फायदे त्यांनी सर्वं उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले ते पुढे बोलत होते. या सर्व्हिस कॅम्प मध्ये ट्रॅक्टर सर्व्हिसिंग ला लागणारे ऑइल फिल्टर व डिझेल फिल्टर फ्री दिले जाईल तसेच संपूर्ण मजुरी फ्री सर्व्हिसवर एक आकर्षक भेटवस्तू दिले जाईल. त्याच प्रमाणे रोटावेटरचे सर्विसिंग मजुरी फ्री दिली जाईल कंपनीचे तज्ञ इंजिनियर कडून ट्रॅक्टर तपासून दिले जाईल त्यासोबत कोणाला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आण्णासाहेब पाटील योजनेत ट्रॅक्टर कमीतकमी डाऊन पेमेंट वर ट्रॅक्टर दिला जाईल तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहेत
या कॅम्प मध्ये जवळपास ७८ ट्रॅक्टर मालकांनी सहभाग घेतला. पावसामुळे १६ ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंग बाकी राहिल्या . सोमवारी या सर्व ट्रॅक्टरची कामे केली जातील असे आश्वासन व्हेनटाईल कंपनीचे वतीने देसाई साहेबानी शेतकऱ्यांना दिले. या कँपचे माध्यमातून शेतकऱ्यांची कमीत कमी १६०० ते ३००० रुपये पर्यंतची बचत झाली.कॅम्प मध्ये मधुकर दोरगे,केरबा गवारे,सोपान गवारे , विलास गवारे, संजय शिंदे, जयसिंग पवार,संदिप गवारे, गणेश दोरगे, राष्ट्रवादी शिरूर तालुका मीडिया सेलचे अध्यक्ष कैलास गवारे आदी ट्रॅक्टर मालक उपस्थित होते
अशा प्रकारचे कॅम्पसचे आयोजन वारंवार झाले पाहिजेत अशा व्यक्त शेतकऱ्यांनी केल्या.
सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीचे व व्हेंटाईल कंपनीचे आभार उद्योजक संजय ढमढेरे यांनी आभार मानले .
