पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावाकडे येणाऱ्या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दयनीय अवस्था झालेली असून याचे सार्वजनिक बांधकाम विभागास काहीही सोयरसुतक नाही सर्वसामान्य माणूस आपला जीव घालवतो आहे परंतु या खात्यास मात्र काही घेणे नाही त्यामुळे हवेली तालुका मनसेच्या वतीने या रस्त्याचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून शासनाचा निषेध केला.
अष्टविनायक सुविधा प्रकल्पातून युती काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मार्गाच्या विकासासाठी १५१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला व हे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार होते परंतु थेऊर फाटा थेऊर गाव दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला त्यावर हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने रस्त्याचे काम अडकून पडले.सध्या केवळ दोन टप्प्यात काम चालू आहे हा टप्पा कधी पूर्ण होईल याची शास्वती नाही. त्यामुळे या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे याची दुरुस्ती देखील केली जात नाही त्यामुळे मनसे च्या वतीने रस्त्याचे श्राध्द घालून निषेध नोंदवला. यावेळी मनसेचे जनहित कक्ष विधी विभागाचे अँड राहुल कदम,माजी तालुका उपाध्यक्ष संदीप नाळे, हडपसर उपविभाग अध्यक्ष सीमा काकडे,तालुका संघटक सुमित गायकवाड, सागर गायकवाड, माही चौधरी,प्रशांत खांडे, विशाल पवार, रोहित सोनवणे, शुभम लटके, राहुल राजगुरू,आप्पा चौधरी, बापु गुजांळ,अक्षय जोशी,रोहित पुजारी,अक्षय मल्लाव,आबा वाळके,सुहास गायकवाड, वैभव गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुभाष काळे,वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या रस्त्याच्या संदर्भात निश्चित माहिती कोणीही देत नाही न्यायालयाने यावर निश्चित काय भूमिका घेतली आहे याची माहिती सार्वजनिक झालेली नाही सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ शेतकऱ्यांना पुढे करून रस्ता तयार करत नाही दोन वर्षांपासून रस्त्यावर चार जनांचा मृत्यू झाला यासाठी कोणास जबाबदार ठरवणार हा प्रश्न आहे तर भविष्यात होणाऱ्या खोळंब्यामुळे किती बळी जाणार याचा विचार होणार की नाही हा दिवाणी प्रश्न नसून दैनंदिन जीवनातील जिव्हाळ्याचा विषय आहे यावर उच्च पदस्थ पदाधिकारी, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
