मुंबई (हवेलीनामा वृतसमूह) मुंबईतील कोपरी गावात एका घरातून 34 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन घराच्या झडतीत दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त ड्रग्ज मिळाले. या ड्रग्सची किंमत बाजारमूल्यानुसार १ कोटी ३६ लाख रुपये एवढी आहे. हे हिरॉईन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरी गावात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने जाळे रचून छापा टाकला. या प्रकरणी 34 वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह यास ताब्यात घेतले असून त्याच्या घरातून १ कोटी ३६ लाख बाजारमूल्य असलेला ड्रग्ज (हिरॉईन) हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे ड्रग्स पंजाबमधून रेल्वे, ट्रकद्वारे आणून महाराष्ट्राच्या अनेक भागासह नवी मुंबईतील तरुणांना विक्री केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

कारवाईत एका आरोपीला अटक केली असली तरी यात अनेकजण सामील असल्याचा संशय असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र नवी मुंबई पोलिसांचे ड्रग्ज मुक्त नवी मुंबई अभियान सुरू असताना अशा कारवाया होत आहेत, ज्यात करोडो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला असे ड्रग्ज पुरवठा करणारे घाबरत नसल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकची माहिती देताना, आम्ही अनेक संशयित ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात केले असून आणि अशा काही नागरिकांना असे संशयित व्यक्ती आढळल्यास आम्हाला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क रहावे असेही पोलिसांनी सांगितले आहे.

पंजाब राज्य संपूर्ण देशात ट्रक विक्री संदर्भात बदनाम झाल्याचे समोर आले आहे, यात अजूनही काही पंजाबी नागरिक अवैध्यरित्या महाराष्ट्रात ड्रग्ज घेऊन येऊन महाराष्ट्रातील तरुणांना जाळ्यात ओढण्याचे काम करत असून अनेक तरुण याला बळी पडत असल्याने त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होऊन अनेक जणांचे जीव गमावले आहेत. मात्र याला आळा घालण्याचे काम पोलिस प्रामाणिकपणे  करत असले तरी याबाबत ड्रग्सच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना आपल्या पालकांनी आवर घालावा असेही पोलिस सांगत आहेत. पालकांनी सतर्कता बाळगडी तर नक्कीच या ड्रगच्या जाळ्यातून युवकांची सुटका करता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *