पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुण्यातील सहा तरुण कोकण पर्यटनासाठी जात असताना रायगड मार्गांवर ताम्हिणी घाटात एका भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या घटनेने पुण्यासह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी आहेत.सोमवारी रात्री ११.३० वाजता हे मित्र थार कार (एम.एच.१२, वायएन ८००४) घेऊन कोकणाकडे निघाले होते. मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे पालकांनी उत्तमनगर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला होता. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून तामिनी घाट परिसरात शोध मोहीम घेतली त्यानंतर पाचशे फूट दरीत एक गाडी दिसून आली त्यानंतर माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकांनी अथक प्रयत्नांनी रोप, स्ट्रेचर व क्रेनच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले. अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला.
