पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बंदी असलेला नायलॉन घेवुन त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन युवकांना मुंडवा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १,०८,८००/-रु. किं. चा नायलॉन मांजा जप्त केला.

मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना बातमीदारमार्फत बातमी मिळली की, हडपसर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन जण नायलॉन मांजा त्यांचे ओळखीचे लोकांना विक्री करण्यासाठी येणार आहेत. तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन त्या ठिकाणी तपास छापा कारवाई केली आणि १) आयुष राहुल शिदे, वय २० वर्षे, रा. ससाणेनगर, अरीहंत रेसीडेन्सी, शिंदे निवास, हडपसर, पुणे २) यशराज विजय दिवेकर, वय २० वर्षे, रा. हिंगणे मळा, भैरवनाथ मंदीराजवळ, हडपसर, पुणे यांना ताब्यात घेऊन १,०८,८००/-रु.कि.चे, मोनो फिलगोल्ड कंपनीचे नायलॉन मांज्याचे रिल असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण करीत आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५. डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती अनुराधा उद्‌द्मले यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड योगेश राऊत, रुपेश तोडेकर व स्वप्नील रासकर यांचे पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *