पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   लोणीकंद थेऊरफाटा या अष्टविनायक महामार्गावर होत असलेल्या रुंदीकरनादरम्यान थेऊर मुळा मुठा नदीशेजारी हमाल चाळीलगत काल संरक्षक भिंतीचा भराव अचानक खचला व तेथे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचला सुदैवाने त्यावेळी कोणतेही जड वाहन त्याठिकाणी नव्हते अन्यथा अनर्थ घडला असता

       अष्टविनायक सुविधा प्रकल्पातून महामार्गाचे रुंदीकरण चालू असून अनेक मार्ग चालू झाले आहेत लोणीकंद थेऊर फाटा या रस्त्याला सुरुवातीपासून अनेक अडचणी निर्माण होत राहिला या रस्त्याचे तीन टप्प्यात काम पूर्ण होणार होते सन २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली काम पूर्ण होण्याचा कालावधी किती याचे काहीही मापदंड नाहीत आजपर्यंत केवळ एक टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यात काम चालू आहे कामाची गती पाहता आणखी किती वर्षे लागतील हे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनाच हे कोडे सुटणार.
        थेऊर गावाशेजारी असलेल्या मुळा मुठा नदी पात्रा लगत असलेल्या रस्त्यावर रुंदीकरण करण्यात आले परंतु रस्त्याचा दबाव किती तयार होईल याची कल्पना संबंधित ठेकेदाराला आली किंवा नाही हे कळले नाही कारण काळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हमाल चाळी लगत रस्त्याने तटरक्षक भिंत तोडून जवळपास १०० फूट रस्ता खचला रस्त्याचा दाब भिंतीवर आला भिंत गेली वीस वर्षे जुनी त्यात दगडात बांधकाम केलेली बाजूनी खोलगट भाग पाणी साचत असल्याने भिंत कमजोर झालेली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *