पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अलीकडे सेंद्रिय अर्थात नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अन्नाचा वापर वाढत आहे. त्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि स्वीडन अॅल्युमनी नेटवर्क महाराष्ट्र अँड गोवा चॅप्टरने सेंद्रीय अन्न सेवनाच्या जागरुकता करण्यासाठी ईट स्मार्ट चॅलेंज अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वीडन अॅल्युमनी नेटवर्क, स्वीडिश इन्स्टिट्यूट, स्वीडनचे वाणिज्य दूतावास (मुंबई) आणि बिझनेस स्वीडन यांच्या सहकार्याने सात दिवस हे अभियान साजरे करण्यात आले.
ईट स्मार्ट चॅलेंज या अभियानात सहभाग घेतलेल्यांनी खाण्याच्या विविध पद्धती सादर केल्या. या ऑनलाईन मोहीम मध्ये पौष्टीक अन्नपदार्थाची निवड आणि त्याचे महत्त्व याविषयची जागरुकता करण्यात आल्याची माहिती एमआयटी आयडी इनोव्हेशनचे संचालक प्रा. तेजस कराड यांनी दिली.
या विषयावर तेजस कराड म्हणाले, बॅक टू बेसिक, टेस्ट नॉट वेस्ट, कुक टुगेदर इट टुगेदर, फूड डिझाईन थिंकिंग, नौ युअर फार्मर, नौ युअर लँडस्केप या कार्यक्रमासाठी निवडलेल्या वेगवेगळ्या थीम होत्या.२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले.
दरम्यान या अभियानात विद्यार्थ्यांनी पौष्टीक अन्नासंदर्भात नवकल्पना आणि डिझायन सादर केल्या. शाश्वत अन्न जागृतीवर पोस्टर बनवण्याची स्पर्धा, सामूहिक पाककला, पारंपारिक स्वीडिश केक बेकिंग, स्नॅक काउंटर स्पर्धा घेण्य़ात आल्या. द इको फॅक्टरी फाउंडेशनल, भारतातील पहिले कचरा व्यवस्थापन पार्क, शाश्वत शेती युनिट, सुहाना मसाले यांना भेट आणि स्वीडनचे कॉन्सुलेट जनरल (मुंबई) येथे प्रत्यक्ष भेटी घेत माहिती घेतील. यावेळी विविध तज्ञ मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभियानात स्वीडनचे कॉन्सुलेट जनरल एरिक मालमबर्ग (मुंबई), चितळे समूहाचे संचालक गिरीश चितळे, प्रवीण मसालेवालेचे संचालक आनंद चोरडिया, फुड डिझाईनर डॉ. फ्रान्सिस्का झॅम्पोलो, वायू-इत्रा, चक्रकार लाइफस्टाइल सोल्यूशन्सचे संस्थापक प्रियदर्शन सहस्रबुद्धे, डिझाईन सल्लागार कुणाल जगताप, एमआयटी-एडीटी विद्यापीठातील क्रीडा आहारतज्ञ अमृता खनके, द रियल ग्रीन किचनच्या संस्थापक ऐश्वर्या विश्वनाथ, डिझाईनर विनित ताम्हणकर, एमआयटी आयडीचे संचालक डॉ. नचिकेत ठाकूर, प्रा. हार्षित देसाई यांनी यात सहभाग नोंदवला.
