पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा)  फुरसुंगी पोलिसांनी अट्टल वाहन चोराकडून वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून  चार दुचाकी मोटारासायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा (२,८०,०००) मुद्देमाल हस्तगत करुन वैभव अशोक पिंगळे(वय२२वर्षे रा.खंडोबाचीवाडी सोमेश्वर ता.बारामती) याला अटक केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
फुरसुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील वडकीनाला येथील  रामा लक्ष्मण भोसले( रा. भोसले वस्ती, वडकीनाला, ता. हवेली) यांनी त्यांची होंडा कंपनीची ड्रिम युगा मॉडेल असलेली दुचाकी  एम एच १२ के यु ३६८४ रात्री घराच्या पार्कीगमध्ये  लॉक करून ठेवली असता दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी त्याठिकाणी दिसली नाही  परिसरामध्ये शोध घेतला असून दुचाकी सापडली नाही यावर त्यांनी  फुरसुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला
 फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना रात्री दिडच्या  स्वराज मंगल कार्यालय, ऊरुळी देवाची येथे पथकास संशयीत एक इसम होंडा ड्रिम युगा दुचाकी वाहनासह संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता उडवा उडवीची देत होता संशयीताकडे मिळून आलेल्या दुचाकीच्या नंबरची माहिती घेतली असता ती दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता तीन दुचाकी मोटारसायकल चोरी केली असल्याची माहिती दिली. त्यात( खडक पोलीस स्टेशन) गुन्हयातील बुलेट मोटारसायकल लोणंद पोलीस स्टेशनला  दाखल गुन्हयातील होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल कोथरुड पोलीस स्टेशन दाखल गुन्हयातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले आहेत. अटक आरोपीकडून फुरसुंगी पोलीस स्टेशन, कोथरुड पो.स्टे. पुणे, खडक पो.स्टे. पुणे व लोणंद पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा असे एकुण चार गुन्हे उघडकीस आणून त्याने चोरी केलेली एकुण २,८०,०००/- रुपये किंमतीची चार दुचाकी वाहने करुन वैभव अशोक पिंगळे, (वय २२ वर्षे, रा. खंडोबाची वाडी, सोमेश्वर, ता.
बारामती)
ही कारवाई पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त  अनुराधा उदमले , यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, यांच्या सुचनेप्रमाणे  तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार हरिदास कदम, नितीन गायकवाड, सागर वणवे, हनुमंत कांबळे, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, पोमण यांनी केली.
पुढील तपास फुरसुंगी पोलिस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *