पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या कारवाईत सतरा लाख ( १७,०८,५५५)रूपये किंमतीचा गुटखा तंबाखुजन्य पदार्थ व गांजा अंमली पदार्थ जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
 अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस स्टाफ असे चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना वडगांव शेरी पुणे येथे श्रवण हनुमाराम गेहलोत, (वय ३५ वर्षे, रा. प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, वडगांव शेरी), लाबुराम पकाराम देवासी, (वय २५ वर्षे, रा. प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, वडगांव शेरी), दिनेशकुमार आचलाराम प्रजापती, (वय ४० वर्षे, रा. प्लॅट नं ३१, पिनाक सोसायटी, वडगावशेरी) यांच्या ताब्यात ६,४५,३१५/- रु किंमतीचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला असा ऐवज मिळून आल्याने तो जप्त करुन आरोपीच्या विरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम  अन्न सुरक्षा मानके अधिनियमाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
 चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत आनंद हाईटस सर्वे नं २२/६, सैनिकवाडी, सोपाननगर, वडगाव शेरी पुणे येथील सार्वजनिक रोडवर विकी विजय काशीद (वय २२ वर्ष रा, ए/ओ गायकवाड सावली हॉटेलचे जवळ, आव्हाळवाडी वाघोली ता, हवेली,  मुळ पत्ता मु.पो. सावळ, ता, बारामती) याच्या ताब्यातील ५२,००० रुपये किंमतीचा २ किलो १०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ सापडला त्यांचेविरूध्द  एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे चंदननगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 तसेच येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजन चौक, भोला पान शॉप, मदर टेरेसा मंदिर जवळ, नगर रोड पेट्रोलपंप समोर, येरवडा येथील पान शॉप चा मालक सुभाषचंन्द्र रामअवध मोर्या, (वय ३४ वर्षे रा. येरवडा दर्गे वाडी, गणेश नगर गल्ली नंबर १ येरवडा  मुळ गांव मु.पो भुतावली, प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्या ताब्यातील १०,११,२४०/- रु किंमतीचा प्रतिबंधक गुटखा व पान मासाला मिळून आल्याने त्याचे विरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई  अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २  राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, महिला पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार अजिम शेख, साहिल शेख, आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, बबनराव केदार, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, शेखर खराडे, दिनेश बास्टेवाड, मच्छिंद्र धापसे, उदय राक्षे, संदिप शेळके, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर व साधना पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *