थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा).वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करत अवैधरित्या लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप मधील सळया शालेय बसमध्ये पाठीमागून घुसल्याने मोठा अपघात झाला त्यावेळी प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला सुदैवाने बसमधील बालकांना गंभीर इजा झाली नाही, अपघात झाल्याचे समाजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पुणे सोलापूर महामार्गावर दुपारी दोन च्या सुमारास सोरतापवाडी गावच्या हद्दीतील कांबळे बाग येथे ऑलिंपस स्कूलची बस जात असताना समोर अचानक दुचाकी गाडी चालवणारा आडवा आला व्हीलर वाला आडवा आल्याने स्कूल बस चालकाने ब्रेक मारला त्यावेळी अवैधरित्या लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या पिक अप गाडीतील अवजड पध्दतीने भरलेल्या पीक अप गाडीची स्कूल बसला जोरात धडक बसली पिक अप ला पाठीमागून हायवा ची धडक बसली त्यामुळे पिकप मधील सळई स्कूल बस मध्ये शिरल्यामुळे तिहेरी अपघात झाला स्कूल बसमध्ये शाळेची लहान होती त्यातील आठ मुलांना व एक शिक्षिका किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आला तर दुचाकी चालक विठ्ठल रघूनाथ चौधरी (वय७०वर्ष या.वाडाची वाडी पेठ)
हे गंभीर जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले व अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
लोखंडाच्या सळ्या घेऊन पुणे सोलापूर महामार्गाने निघालेला हा पिकअप महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या नजरेत का आला नाही सर्व वाहतूक नियमांची उल्लंघन करून अशा प्रकारची अवजड वाहतूक हलक्या वजनांच्या वाहनातून होते यावर वाहतूक नियंत्रण शाखा कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे यामा या महामार्गावर वारंवार अपघात होतात नागरिकांनी या प्रश्नावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली आहे.
