पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा )  प्रवाशांना रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या  रिक्षाचालक व विधीसंघर्षीत बालकांकडुन एकुण ३,७०,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त वानवडी पोलिसांची कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत  असताना तपास पथकाला गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की तीन जण रिक्षा मध्ये येऊन जुना  मोबाईल बिहारी माणसाला  विक्री करत असून तो चोरीचा असण्याची शक्यता असल्याची महिती मिळाली “नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर पासुन आतमध्ये जाणारे कच्च्या रस्त्यावर हडपसर येथे आले असल्याची माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली  असता रिक्षामध्ये थांबलेले इसमांजवळ जाताच ते रिक्षा चालु करुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस स्टापने शिताफिने  फैजान मोहम्मद गौस शेख, (वय २४ रा. जामा मज्जीदजवळ, आशियाना बिल्डींग, तिसरा मजला, आदर्श नगर, ऊरुळी देवाची) व दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेऊन रिक्षाची पाहणी केली असता एक मोबाईल हॅन्डसेट व एक चाकु मिळुन आला  फैजान शेख यांने सांगितले की, दोन महिन्यापुर्वी आम्हां तिघांनाही पैशाची आवश्यकता असल्याने आमच्यातील एका विधीसंघर्षित बालकाने रिक्षा आणली असता रिक्षामधुन पुणे स्टेशन येथुन एका प्रवाशाला शिवाजीनगर येथे सोडतो असे सांगुन त्यास रिक्षामध्ये बसवुन टर्फ क्लब रेसकोर्स भैरोबानाला पुणे येथे निर्जन स्थळी घेवुन आलो आणि त्यास चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील एक मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असे काढुन घेतलेचे कबुल केले १ मोबाईल, एक चाकू व गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण ८०,१००/-रुपये किमतीचा मुद्देमाल व इतर गुन्हयात चोरी केलेल २,९०,१००/-रु.किमतीचे२९ मोबाईल असे एकुण ३,७०,२००/-रु.किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,  पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे,  सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,  पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे महीला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने केली.
पुढील तपास वानवडी पोलिस करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *