पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)  पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई  ३७.६० ग्रॅम मेफेड्रोन (एम. डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारे रेकॉर्डवरील चार
गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन दोन दुचाकी असा एकूण  ९लाख३७हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना महंमदवाडी येथील स.नं. ४२ मधील महाराष्ट्र वनविभागच्या आनंदवन मध्ये मोकळ्या जागेत पाच इसम संशयितरित्या कोणाची तरी वाट पाहत बसलेले दिसले. त्यानंतर पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी अत्यंत शिताफीने ४ जणांना ताब्यात घेतले  यात मतीन हुसेन मेमन (वय २५ वर्षे, रा. स.नं ४२ हादीया हाईटस, फ्लॅट नं ७०, कोंढवा), फैजल नैशाद मोमीन (वय २६ वर्षे, रा. सी/ओ सरफराज साईबाबानगर, कोंढवा खुर्द), फैयाज युसुफ शेख (वय ३६ वर्षे, रा. मारुती आळी, गणपती चौक, शिवगंगा सोसायटी समोर, कोंढवा), सुरज राजेद्र सरतापे (वय २८ वर्षे, रा. चिमटा वस्ती, सनपॅट्रीक चर्चच्या पाठीमागे, फातीमा नगर ) यांच्याकडे  मेफेड्रॉन एम.डी हा अंमली पदार्थ सापडला तो त्यांनी  विक्रीकरीता आणला होता त्यामुळे  त्यांच्या विरुध्द काळेपडळ पोलीस स्टेशन येथे  एन.डी.पी.एस. अॅक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून ३७.६० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ ७,५२,००० रूपये किंमतीचे अंमली पदार्थ गुन्ह्यात वापरलेले ०५ मोबाईल ९५,०००/- रु ०२ दुचाकी गाडी ९०,०००/- रु.किमतीचा असा एकुण ९,३७,०००/- किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला
ही कारवाई  पोलीस आयुक्त  अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे. सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १  विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक  प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितिन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *