पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ) मौजमजेसाठी गाड्या चोरणाऱ्या विधी संघर्षित बालकांकडून हडपसर पोलिसांनी वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणुन गावठी कट्टा-जिवंत काडतूस केले जप्त.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोजागिरी पौर्णिमानिमित्त हडपसर पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अमित साखरे आणि महावीर लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील मांजरी परिसरात संशयितांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळ एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस मिळून आले.
विधीसंघर्षित बालक यांच्याकडे कौशल्यपुर्ण चौकशीत संबधित अल्पवयीन बालकांनी गेल्या वर्षभरात त्यांनी मौजमजेसाठी हडपसर परिसरातून अनेक दुचाकी व रिक्षा चोरी करून नंतर विविध ठिकाणी सोडून दिल्याचे सांगितले तपासात त्यांनी ८ गुन्ह्यांची घटनास्थळे दाखवून गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे आधीपासूनच गुन्हे दाखल होते.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ चे डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी जगताप यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली आहे.
