लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर . 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 ते सायंकाळी 06:00 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे,तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मोफत हेल्मेट वाटप करण्यात येणार आहेत.

यामध्ये भव्य रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप, मोफत आरोग्य शिबीर, ब्लड कॅन्सर डोनर नोंदणी कॅम्प अश्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या मोफत शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आरोग्य शिबीर संभाजी नगर ओपन स्पेस, महालक्ष्मी मंदिर, ज्ञानदीप शाळेसमोर आयोजित केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *