थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर(ता.हवेली) विजयादशमी पारंपरिक मिरवणूकीने उत्साहात साजरी करण्यात आली गेली दहा दिवस चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थेऊरच्या दसऱ्यास ऐतिहासिक परंपरा लाभली असून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी निघते.ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करुन पालखी गणपती मंदीर चौकात येते फटाक्यांची आतिषबाजीने परिसर दुमदुमून निघला

नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर गेली नऊ दिवस थेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हातारीआई व तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दसऱ्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी गणपतीची महापुजा अजय आगलावे यांनी केली.दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.सायंकाळी पाच वाजता श्री चिंतामणीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघन करण्यासाठी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी वाजतगाजत निघतात यासाठी थेऊर येथील आगलावे बंधू याचा भारत बँड हे याचे खास आकर्षण असते.ही पालखी देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यात संकेत आगलावे,गजानन आगलावे,मुकुंद आगलावे,सुधीर आगलावे, राहुल आगलावे यांनी सारथ्य केले. या सोहळ्याला गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती गावातून पालखी सोहळा जातो त्या मार्गावर रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालुन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वय सामितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,थेऊरचे माजी उपसरपंच विलास कुंजीर,नितिन दिलीप कुंजीर, शहाजी जाधव,गोविंद तारु, उपसरपंच आप्पासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, शरद काकडे, संजय कुंजीर,विजय कुंजीर, प्रकाश पायगुडे,सुरेश चव्हाण,सुखराज कुंजीर, मुंबई महापौर कैसरी आबा काळे, विजय कुंजीर, दत्तात्रय तांबे,एकनाथ काळे, रमेश कुंजीर,सुभाष कुंजीर,आनंद वैराट, महादेव धारवाड,गणेश रसाळ, गणेश कांबळे, बाळासाहेब शिर्के, केलास ढवळे अर्जुन देवकर,प्रतिक कंद, चंद्रकांत तारु,लक्ष्मण चव्हाण, सुजीत काळे,गणेश काळे,सुमित कुंजीर,अजय पवार, मारुती राऊत, प्रकाश आळंदे,अर्जुन काकडे,सचिन कांबळे,एकनाथ जगताप उपस्थित होते.यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के,पोलिस हवालदार दिगंबर जगताप, चंद्रकांत माने,महिला पोलीस हवालदार नागवडे,प्रशांत सुतार,तसेच होमगार्ड उपस्थित होते.
