लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) जेवणाच्या ऑर्डर चे पार्सल देण्यासाठी आलेल्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयला तीन जणांनी मारहाण करुन पळून गेलेल्या तीन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावन हॉटेल, लोणी काळभोर येथन जेवणाचे पार्सलची झोमॅटो डिलीव्हरी देण्यासाठी सायंकाळी ४वाचण्याच्या सुमारास  पुणे सोलापूर रोडवरील कदमवाकवस्ती, येथील झुडीओ शॉपचे समोर सर्विस रोडलगत  झोमॅटो डिलिव्हरी बॉय स्वप्निल ईश्वर काळे वय ३७वर्ष रा.श्री स्वामी समर्थ रेसिडेन्सी मांजरी गोपाळ पट्टी)हा पार्सल घेऊन आला असता आणलेली ऑर्डर ऑर्डर रद्द करण्यास सांगितली असता डिलिव्हरी बॉय ने ती जेवणाची ऑर्डर रद्द केली थोड्यावेळाने परत तीच ऑर्डर आम्हाला पाहिजे असे सांगून हुज्जत घालण्यात सुरुवात केली व डिलिव्हरी बॉय ला लाथा बुक्याने मारहाण करून त्याच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल व जेवणाचे पार्सल असा हिसकून घेऊन पळून गेले असता काळे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली असता मारहाण करणारे  स्वप्रिल भागवत बंगले (वय 24 वर्षे, रा. भगवा चौक, सिद्राम मळा, लोणीकाळभोर, ता. हवेली,)
2) रोहन अजिनान लोंढे(, वय 26 वर्षे, रा. पाषाणकर बाग, लोणीकाळभोर, ता. हवेली)
3) अजित शहाजी चांदणे, (वय 21 वर्षे, रा. गायकवाड वस्ती, धनलक्ष्मी पार्क, कदमवाकवस्ती लोणीकाळभोर,) याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर,पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर,रत्नदिप बिराजदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *