पुणे (हवेलीनामा वृतसमूह) काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्यास काळेपडळ पोलिसांनी बेडया ठोकल्या व त्यांच्याकडून एकुण ०९,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी काळेपडळ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले व महादेव शिंदे हे पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेट देवून चोरी करणारे अज्ञात चोरटयाचा शोध घेत असता बंका सफायर सोसायटी, आंबिका हॉटेल रोड, पिसोळी, उंड्री, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी केली तसेच घटनास्थळी मिळुन आलेल्या फुटेजमध्ये आरोपी हा त्याच्या मोबाईलवरून बोलत असल्याचे दिसून आले. त्यावेळी मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित इसम हा कोंढवा येथे असल्याचे समजले त्यावर त्यास तेथून ताब्यात घेऊन त्याच्या चौकशित त्याचे नावं मुस्तफा शकील अन्सारी, वय ४१ वर्षे, रा.स.नं.४२, जवाहरगंज, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे तसेच वापरलेली दुचाकी गाडी व मोबाईल फोन असा एकुण ०९,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडल पोलीस स्टेशन मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे, अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीरकर व महादेव शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *