पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील मार्वल फिगो बिल्डिंग मधील अनाधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील मगरपट्टा रोडवर सिझन मॉल जवळील मार्वल फिगो बिल्डींगच्या ४ थ्या मजल्यावर ऑफीस नंबर ४०१०,४०२०, ४०३० या ठिकाणी अवैद्यरित्या अमेरीकन ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक यावर मालवेअर (पॉपअप) टाकण्यात येत होता व त्यांना कॉल करुन मालवेअरची भिती घालुन त्यांच्या फोन, संगणकामधील माहिती तसेच त्यांचे बँक अकाऊंट डिटेल्स व क्रेडीड कार्डचे डिटेल्स चोरीला जाण्याची भिती दाखवली जात होती. वेगवेगळ्या प्रकाराचे अॅन्टीव्हायरस, प्रोटेक्शन अॅप तसेच सेटींग सांगुन नागरिकांकडुन क्रिप्टो करन्सी (अभासी चलन) हे त्यांचे बायनान्स (ट्रस्ट वॉलेट) यावर स्विकारुन त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात येत होती. सदर अनाधिकृत कॉल सेंटवर छापा टाकून कारवाई करण्यात आली
 यात घटनास्थळावरुन २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाईल, ७ राऊटर व इतर ईलेक्ट्रीक साहित्य असे मिळुन एकुण १५,७६,९००/- रु.चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. कॉल सेंटरचे चालक मालक १) निर्मल अजय शहा ( वय. ३८ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ए/७११ कुमार पिकासो सोसायटी हडपसर),. २) अतुल प्रविणभाई श्रीमाळी, (वय. ३० वर्षे, सध्या रा. फलॅट नंबर १०२ लेबरनम पार्क सोसायटी मगरपट्टा हडपसर ) ३) युगंधर संजय हादगे, (वय. ३४ वर्षे, रा. स.नं.१२७/३ शोभा निवास, शिवकृष्ण हौसिंग सोसायटी झेड कॉर्नर मांजरी ) कॉल सेंटरमध्ये काम करणारे २९ कामगार यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे तर ०२ पाहिजे आरोपींचा शोध सुरु आहे. सदर कारवाई बाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख,  पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे  राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०५ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, छबु बेरड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खरात, संतोष तानवडे, अभिजीत पवार, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अमर चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, विनोद निंभोर, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, गणेश माने, परमेश्वर कदम, राजेश लोखंडे, कैलास चव्हाण, संतोष होले, गणेश गोसावी, दत्तात्रय खरपुडे व सुनिल महाडीक यांच्या पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *