थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीनाथ पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या सभासदांना संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी १४ टक्के लाभांश जाहीर केला.
 थेऊर फाटा- कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील श्रीनाथ पतसंस्थेचा  २५ वर्ष पूर्ण होत असल्याने  रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत संस्थेने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते  यामध्ये सभासद करिता महारोग्यशिबीर, प्रशिक्षण शिबीर, वार्षिक सभा आणि रौप्य महोत्सव सोहळा यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक  सुरेश घुले, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन अध्यक्षा रेश्मा भोसले उपस्थितीत होते.
यावेळी कृषी मंत्री यांनी संस्थेचा गौरव करुन
सभासदांना मार्गदर्शन करून संस्थेचे चालक संदिप सुखाराज धुमाळ व  सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले
 संस्था २५ वर्ष पूर्ण करत आहे हा सर्व प्रवास सभासदाच्या विश्वासावर शक्य झाला आहे  त्या निमिताने एक कृतज्ञता म्हणून सभासदांना भेट वस्तू यामध्ये ट्रव्हल्स बँग, डिनर सेट, टिफिन सेट आदिचे वाटप प्रमुख पाहुणे यांचे हस्ते प्रातनिधिक स्वरुपात करण्यात आले. तसेच संस्थेला अहवाल वर्षात  १ कोटी ५० लाख रुपये निव्वळ नफा झाला असून, संस्थेच्या सभासंदाना १४ टक्के लाभांश देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्रीनाथ पतसंस्थेची २५वी वार्षिक साधारण सभा नुकतीच पार पडली. संस्था आपल्या बँकिंग कार्या सोबत सामाजिक बांधिलकीची जोपासना करत असताना वार्षिक सभेच्या निमित्ताने विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘श्रीनाथ गुण गौरव पुरस्कार
२०२५’ देऊन गौरव केला. यामध्ये पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थी, तसेच विविध पदावर नियुक्त झालेले सभासद खातेदार यामध्ये  ज्ञानेश्वर धुमाळ, सुनिता धुमाळ, गणेश आंबेकर, राजाराम काकडे, सचिन मोहन धुमाळ यांचा सन्मान करण्यात आला.
या पतसंस्थेला सन २०२४-२०२५ वर्षात १ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, ३१ मार्च २०२५ अखेर ४१ कोटी ७९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने ३४ कोटी ३६ लाख रुपयाचे कर्ज वाटप केले असून, गुंतवणूक २२ कोटी ८० लाख रुपयांची केली आहे.
संस्थेचे एकूण खेळते भांडवल ६१ कोटी रुपये असून, संस्थेची वसुली ९१.६७ टक्के असून, एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी दिली.
सभेचे अहवाल वाचन व सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले. या वेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संभाजी आंबेकर, महादेव धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, माजी सरपंच सुनीता धुमाळ, वैशाली मेमाणे, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, अजय कुंजीर, राजेंद्र गायकवाड, उमेश राखपसरे, विश्वनाथ रूपनर, पोपट चौधरी, दत्तात्रेय कुंजीर आणि व्यवस्थापक शिवाजी जवळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *