पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याने 25 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून

 दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार, एका 42 वर्षीय तक्रारदाराने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तपासी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या लोकसेवक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील मोहम्मद शेख (वय 45वर्ष लोणावळा शहर पोलीस स्टेशन) यांनी यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार कडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. असता  तक्रारदाराने याबद्दल दिनांक 23सप्टेबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली तक्रारीची पडताळणी केली असता दिनांक 25सप्टेबर रोजी 20 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले त्याच्याविरुद्ध नारायणी धाम पोलीस चौकी येथे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक   शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *